[nashik] - गांधींवरील नाटकाने जिंकली मने

  |   Nashiknews

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील राष्ट्र सेवा दलातर्फे आयोजित खान्देशस्तरीय नाट्य प्रशिक्षण शिबिराचा येथील माळी समाज मंगल कार्यालयात समारोप झाला. या शिबिरात धुळे, चाळीसगाव, अमळनेर, शेंदुर्णी (ता. जामनेर), सिन्नर, मालेगाव येथील ७५ मुले सहभागी झाली होती.

'गांधींचं करायचं काय?' या नाटकाने महात्मा गांधींबद्दल असलेले गैरसमज मोडीत काढत प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला.

व्यासपीठावर प्रमुख अतिथी साहित्यिक डॉ. विनोद गोरवाडकर, सेवा दल राज्य कार्याध्यक्ष गोपाळ नेवे, माजी कार्याध्यक्ष राजाभाऊ अवसक, तालुका कार्याध्यक्ष विकास मंडळ, दिग्दर्शक प्रशिक्षक प्रतीक जाधव, गीतांजली भापकर प्रमुख उपस्थित होते. सेवादल मनपा जिल्हा कार्याध्यक्ष विलास वडगे अध्यक्षस्थानी होते. सेवा दलाचे नेवे यांनी संघाना आपापल्या भागात या नाटकाच्या माध्यमातून गांधी विचार पोहचविण्याचे मोठे काम करायचे आहे असे आवाहन केले. दिग्दर्शक प्रतिक जाधव यांनी नाटकाविषयी माहिती दिली. गीतांजली भापकर यांचे 'अल्ला तेरो नाम' या गाण्यावरील नृत्य व कलाकारांचे 'वैष्णव जन' या गाण्यावरील नृत्य सादर करण्यात आले.

फोटो - http://v.duta.us/-WPryAAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/cr99eAAA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬