[nashik] - नाशिकचे विजेतेपद हुकले

  |   Nashiknews

मुलींच्या गटात उपविजेते; दोघींची राज्य संघात निवड

राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा

म. टा. वृत्तसेवा धुळे

तीन दिवसांपासून सुरू असलेल्या ३६ व्या राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत किशोरी गटात नाशिकचे विजेतेपद हुकले. अंतिम सामन्यात नाशिकला पुण्याकडून पराभव पत्करावा लागला. तर किशोर गटात नाशिकला सातव्या स्थानी समाधान मानावे लागले. या स्पर्धेत किशोर गटाचे विजेतेपद उस्मानाबाद तर किशोरी गटात पुण्याने विजेतेपद पटकावले. नाशिकच्या ललिता गोबाले व सोनाली पवार यांनी महाराष्ट्राच्या संघात स्थान मिळविले, तर चिंतामण चौधरी व ज्योती मेढे यांची राखीव खेळाडू म्हणून निवड झाली आहे. धुळे येथे रविवारी ही स्पर्धा झाली.

धुळ्यात सुरू असलेल्या राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत रविवारी (दि. २२) अंतिम सामने पार पडले. किशोर गटात पुणे विरुद्ध उस्मानाबाद सामना रंगला. उस्मानाबाद संघ पाच मिनिटे व एक गुण राखून विजयी झाला. सामन्यास पंच म्हणून वीरेंद्र भुवळ, किशोर पाटील, महेश करमळकर यांनी काम पाहिले. तर किशोरी गटाचा अंतिम सामना नाशिक विरुद्ध पुणे यांच्यात झाला. यामध्ये पुणे संघानेही पाच मिनिटे व एक गुण राखून विजय मिळविला....

फोटो - http://v.duta.us/i2_fWQAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/wN_sXQAA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬