[nashik] - शैक्षणिक - स्कूलमेट

  |   Nashiknews

रंगुबाई जुन्नरे शाळेत इंटरअॅक्ट क्बलची स्थापना

नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित रंगुबाई जुन्नरे हायस्कूलमध्ये रोटरी क्लब, नाशिक अंतर्गत २०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठी इंटरअॅक्ट क्लबची स्थापना करण्यात आली. रोटरी क्लब ही गेल्या अनेक वर्षांपासून समाजासाठी स्वयंस्फुर्तीने काम करणारी संस्था असून विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच समाजसेवेची आवड निर्माण व्हावी, समाजाप्रती आपण काही देणे लागतो याची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी या उद्देशाने इंटरअॅक्ट क्लब सुरू करण्यात आला. येत्या वर्षभरात क्लबच्या माध्यमातून वृक्षारोपण, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप, सार्वजनिक स्वच्छतेबाबत जनजागृती करणे, प्रदूषण व जागतिक तापमान वाढीच्या समस्येकडे समाजाचे लक्ष वेधणे यासारखे कार्यक्रम राबविण्याचा मानस यावेळी विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. या क्लबची स्थापना माननीय मुख्याधापिका नंदा पेटकर यांच्या मार्गदर्शनाने झाली असून अध्यक्षपदी साक्षी नेहेरे, उपाध्यक्ष रचित पीचा, सचिव सार्थक कांबळे आणि खजिनदार गौरव देसले यांची निवड करण्यात आली. यासाठी विद्यार्थ्यांना शाळेचे शिक्षक अमित देशपांडे आणि अरविंद देसले यांचे सहकार्य लाभले....

फोटो - http://v.duta.us/UMMi9QAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/eINV3wAA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬