[nashik] - ‘श्वास मोकळा घेते’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन

  |   Nashiknews

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

'आम्ही लेखिका' नाशिक शाखेतर्फे 'श्वास मोकळा घेते' या प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचे प्रकाशन सोहळा साहित्यिक प्राचार्या डॉ. वेदश्री थिगळे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. कविता बोंडे या उपस्थित होत्या. या वेळी सुमती पवार यांच्या 'सुमतीचे श्लोक भाग २' व कवयित्री ज्योत्स्ना पाटील यांच्या 'अंतरंग सुगरणींची खवय्येगिरी सर्वांची' या पुस्तकाचेदेखील प्रकाशन करण्यात आले. या उपक्रमाचे प्राचार्य थिगळे यांनी कौतुक केले.

कॉलेज रोडवरील कृषीनगर हॉल येथे झालेल्या या सोहळ्यात 'कविता अंतरंगातून येते तेव्हा शब्दांना नतमस्तक व्हावंच लागेल,' असे मत थिगळे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमानंतर राज्यभरातील कवी व कवयित्रींसाठी भव्य खुले काव्यसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. सहभागी कवींचा प्रमाणपत्र, तुळशीचे रोप व गुलाबपूष्प देऊन गौरव करण्यात आला. नाशिक शाखेतील विविध क्षेत्रांत आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या रणरागिणींचाही या वेळी विशेष सत्कार करण्यात आला. यात डॉ. प्रतिभा जाधव, सुमती टापसे, वैशाली जाधव-शिंदे, अलका कुलकर्णी, संयुक्ता कुलकर्णी व सीमा आडकर यांना सन्मानित करण्यात आले. 'आम्ही लेखिका' नाशिक शाखेच्या अध्यक्षा डॉ. प्रतिभा जाधव, उपाध्यक्ष अॅड. मिलन खोहर, सचिव स्वाती पाचपांडे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. रंजना बोरा, आरती डिंगोरे यांनी सूत्रसंचालन केले....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/kmoaDwAA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬