[nashik] - हिंदी गीतांमध्ये रंगले रसिक

  |   Nashiknews

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'रिमझिम गिरे सावन..', 'एक हंसी शाम को..', 'फिर वही शाम..', 'तुम गगन के चंद्रमा..' 'तुझसे नाराज नहीं जिंदगी..,' अशा आजही मनामनात बसलेल्या हिंदी गीतांनी नाशिककर रसिकांची मने जिंकली. निमित्त होते, डॉ. राजन ठाकूर प्रस्तुत 'एक रुहानी शाम' या हिंदी गीतांच्या मैफलीचे. कुसुमाग्रज स्मारकातील विशाखा हॉलमध्ये रविवारी सायंकाळी हा कार्यक्रम पार पडला. डॉ. राजन ठाकूर व डॉ. मृणाली मालपाठक यांनी गीतांचे सादरीकरण केले.

'तू इस तरह सें मेरी जिंदगीमें शामिल है..,' या गीताके कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर 'तू इस तरह से..', 'शाम ए ग की कसम..', 'न किसी के आंख का नूर..', 'कश्ती का खामोश सफर..', 'फिर मिलोगे कभी..', 'न पूछो कोई हमें..', 'कई बार यूही देखा है..', 'बडी सुनी सुनी है..', 'आपके हसीन रुख पें..', 'बडे अच्छे लगते है..', 'इशारो इशारो में..' 'कुछ ना कहो..' या गीतांचे सादरीकरण करण्यात आले. गीतांबरोबरच विविध अभिनेत्यांच्या जीवनप्रवासावर प्रकाश टाकून कार्यक्रमाची रंगत वाढविण्यात आली. प्रेक्षकांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 'वन्स मोअर'च्या आग्रहाने कार्यक्रमात उत्साह संचारला होता. प्रशांत महाले व सहकलाकारांनी संगीत संयोजन केले होते. शशांक यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले. रणधीर ठाकूर यांनी आभार मानले.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/g2ItMAAA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬