[navi-mumbai] - कॅप्टन लेडीज सर्व्हिस बारवर छापा

  |   Navi-Mumbainews

म. टा. वृत्तसेवा, पनवेल

मध्यरात्री उशिरापर्यंत अश्लील चाळे करून नृत्य सुरू असणाऱ्या कॅप्टन बारवर कळंबोली पोलिसांनी शनिवारी छापा टाकला. ग्राहक, वेटर आणि चार बारबाला असे मिळून ५८ जणांना अटक करण्यात आली होती. कळंबोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश गायकवाड यांच्या मार्गदर्शनानुसार ही कारवाई करण्यात आली.

शनिवारी रात्री अडीचच्या सुमारास कळंबोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश गायकवाड गस्त घालत असताना कळंबोली गावाला लागून असलेला कॅप्टन लेडीज सर्व्हिस बार दोन वाजता परवानगी नसतानाही सुरू असल्याचे समजले. कर्मचाऱ्यांसह बारवर छापा टाकला असता ग्राहकांच्या समोर चार बारबाला अंगविक्षेप करून तोकड्या कपड्यांत नृत्य करीत असल्याचे आढळले. सकाळी चार वाजेपर्यंत सुरू असलेल्या कारवाईत दोन वेटर, एक डिजेचालक, चार बारबाला, एका कॅशिअरसह बारबालांवर पैसे उधळून नृत्य करण्यास प्रवृत्त करणाऱ्या ४७ ग्राहकांवर कारवाई करण्यात आली. कळंबोली पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक शिवाजी वाकरेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भादंवि २९४, ११४, ३४ आणि मुंबई पोलिस कायदा कलम, महाराष्ट्र हॉटेल उपहारगृह अश्लील महिलांचे नृत्य कायदा अधिनियम याप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले. रविवारी अटक करण्यात आलेल्या सर्वांची पनवेल न्यायालयाने प्रत्येकी १० हजार रुपयांच्या व्यक्तिगत जातमुचलक्यावर जामिनावर सुटका केली. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक धैर्यशील घाडगे करीत आहेत....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/fWhmKwAA

📲 Get Navi-mumbai News on Whatsapp 💬