[navi-mumbai] - गानकोकिळेच्या वाढदिवशी पनवेलमध्ये ‘लता-९०’

  |   Navi-Mumbainews

\Bकल्चर क्लब लोगो

\B

म. टा. प्रतिनिधी, पनवेल

हिंदी चित्रपटसंगीताचे सुवर्णयुग साकारण्यामध्ये अनन्यसाधारण सुरेल योगदान देणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका लता मंगेशकर या चालतीबोलती अख्यायिकाच ठरल्या आहेत. येत्या २८ सप्टेंबरला लतादीदी वयाची ९० वर्षे पूर्ण करीत आहेत. या भारतरत्न गायिकेच्या अलौकिक, स्वर्गीय, नादमधुर आवाजातील हजारो गाणी ही देशभरातील रसिकांच्या मर्मबंधातील ठेव आहेत. लतादीदींच्या ९०व्या वाढदिवसानिमित्त त्यांना सांगीतिक मानवंदना देण्यासाठी 'लता-९०' - अ सॅल्यूट टू दि लिव्हिंग लीजंड' हा सर्वांगसुंदर कार्यक्रम 'दि डिव्हाइन म्युझिक अनलिमिटेड'तर्फे पनवेलमध्ये आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र टाइम्सच्या कल्चर क्लब अंतर्गत हा कार्यक्रम होत आहे.

हा कार्यक्रम लतादीदींच्या वाढदिवशीच म्हणजे, शनिवार २८ सप्टेंबर रोजी रात्री ८.३० वाजता पनवेलच्या आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होईल. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे लतादीदींना अढळ शिखरावर पोहोचण्यास आधारभूत ठरलेल्या शंकर जयकिशन, सी. रामचंद्र, नौशाद, मदनमोहन, सचिनदेव बर्मन, रोशन, सलिल चौधरी, चित्रगुप्त, लक्ष्मीकांत प्यारेलाल, राहुलदेव बर्मन आदी २५ प्रतिभासंपन्न संगीतकारांचे प्रत्येकी एक गाणे यावेळी सादर होणार आहे. ही एकापेक्षा एक सरस एकल लतागीते प्रसिद्ध पार्श्‍वगायिका संजीवनी भेलांडे, संगीत अभ्यासक डॉ. मृदुला दाढे-जोशी सादर करणार आहेत. याशिवाय अस्मिता काळे, आकांक्षा भोईर आणि सारेगम लिटल चॅम्प मिथिला माळी या गायिकांचाही यात सहभाग आहे. संगीतक्षेत्रातील उत्कृष्ट १२ वादक या गायिकांना सतार, बासरी, गिटार, अॅकॉर्डियन, सिंथेसायझर, तबला, ढोलक, ऑक्टोपॅड आदी वाद्यांवर संगीतसाथ करतील. निवेदनाची आघाडी प्राजक्ता जोगळेकर सांभाळणार आहेत....

फोटो - http://v.duta.us/OiwvBwAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/eShCmAAA

📲 Get Navi-mumbai News on Whatsapp 💬