[navi-mumbai] - रस्त्यांसह पदपथांचीही दुरवस्था

  |   Navi-Mumbainews

रस्त्यांवर खड्डे तर पेव्हर ब्लॉक उखडलेले

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई

पावसामुळे एकिकडे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे, रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे... त्यामुळे रस्त्यावरून वाहन चालवणे मोठे जिकिरीचे झाले असताना दुसरीकडे नागरिकांना चालण्यासाठी उभारलेल्या पदपथांचीही दुरवस्था झालेली पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी पदपथांवरील पेव्हर ब्लॉक उखडले आहेत तर, काही ठिकाणी हिरवळ येऊन पदपथ निसरडे झाले आहेत. त्यामुळे तिथून चालताना मोठी कसरत करावी लागते. या पदपथावरून घसरून अपघातही होऊ लागले आहेत. नेरूळमधील एका महिलेचा पदपथावरून चालताना घसरून अपघात होऊन तिचा हात फ्रॅक्चर झाल्याची घटना नुकतीच घडली. त्यामुळे किमान या पदपथांची स्वच्छता करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

नेरूळ, सानपाडा, सीवूड, वाशी येथील अनेक ठिकाणी पदपथ उखडले आहेत तर ज्या ठिकाणी पदपथ व्यवस्थित आहेत, त्या ठिकाणी त्यांची सफाई वेळेवर होत नसल्याने तिथे हिरवळ येऊन पदपथ निसरडे झाले आहेत. त्यामुळे अनेकजण या पदपथावरून चालताना घसरून पडत आहेत. नेरूळमधील आरती चौहान चालण्यासाठी बाहेर पडल्या असताना पदपथावरून पाय घसरून पडल्याने त्यांना दुखापत झाली. यात त्यांचा हात फ्रॅक्चर झाला. पदपथाची योग्य स्वच्छता होत नसल्याने माती साचून हे पदपथ निसरडे झाले आहेत. त्यामुळे त्यांची सफाई करावी, अशी मागणी आरती चौहान यांनी पालिकेकडे केली होती. मात्र त्याचा काही उपयोग झाला नसल्याचेच या प्रकारावरून दिसत आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/bG5s1wAA

📲 Get Navi-mumbai News on Whatsapp 💬