[navi-mumbai] - सरकार भाजपचेच

  |   Navi-Mumbainews

काहीही घडले अथवा काहीच घडले नाही, तरी महाराष्ट्रात भाजपचेच बहुमताचे सरकार येणार. देवेंद्र फडणवीस हेच भाजपचे आगामी मुख्यमंत्री असतील. - अमित शहा

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

'महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत काहीही झाले तरी, भाजपचा विजय निश्चित आहे. भाजपच राज्यात बहुमताचे सरकार स्थापन करील', असे सांगत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी एकप्रकारे अधिक जागांची मागणी करणाऱ्या शिवसेनेला इशाराच दिला आहे. त्याचवेळी 'सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्रातील भाजपचे आगामी मुख्यमंत्री असतील', अशी घोषणाही शहा यांनी केली.

कलम ३७० तसेच जम्मू-कश्मीरमधील परिस्थितीबाबत गोरेगावच्या नेस्को संकुलात गृहमंत्री अमित शहा यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. शहा यांचे दुपारी मुंबई विमानतळावर भाजपकडून जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, पालकमंत्री विनोद तावडे, शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा उपस्थित होते. यानंतर आपल्या भाषणात शहा यांनी, 'कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयाबाबत हा कार्यक्रम होत असल्याने ही भाजपसाठी विधानसभा निवडणुकीची शुभ सुरुवात आहे', असे स्पष्ट केले. 'काहीही घडले अथवा काहीच घडले नाही, तरी भाजपचा विजय निश्चित आहे. भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार राज्यात येईल', असा विश्वास व्यक्त करीत त्यांनी एकप्रकारे युतीच्या अडलेल्या विषयाकडे लक्ष वेधल्याचे बोलले जात आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/SVMgpwAA

📲 Get Navi-mumbai News on Whatsapp 💬