[navi-mumbai] - १५ मुख्याध्यापकांची पदे रिक्त

  |   Navi-Mumbainews

गेल्या नऊ वर्षांपासून प्रभारी मुख्याध्यापक पदोन्नतीच्या प्रतीक्षेत

मनोज जालनावाला , नवी मुंबई

नवी मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागात माध्यमिक विभागासाठी मुख्याध्यापकांच्या मंजूर १७ पदांपैकी १५ पदे रिक्त असल्याने शिक्षण विभागाच्या ढिसाळ कारभाराची लक्तरे लोकप्रतिनिधींनी वेशीवर टांगली आहेत. परिणामी गेल्या नऊ वर्षांपासून १५ प्रभारी मुख्याध्यापक पदोन्नतीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे पदोन्नती समितीची बैठक लवकरच घेऊन माध्यमिक शिक्षकांना पूर्वलक्षी प्रभावाने मुख्याध्यापकपदावर पदोन्नती देण्यात यावी, अशी मागणी माध्यमिक शाळांच्या प्रभारी मुख्याध्यापकांनी आयुक्तांकडे केली आहे.

सहाय्यक शिक्षकांना मुख्याध्यापकपदी नियुक्ती करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या समितीची गेल्या चार वर्षांत एकही बैठक झाली नसल्याने महापालिकेच्या १५ माध्यमिक शाळांच्या रिक्त असलेल्या मुख्यध्यापकपदाची कामे सहाय्यक शिक्षक प्रभारी म्हणून सांभाळत आहेत. शिक्षण विभागाच्या या ढिसाळ कारभाराला तत्कालीन शिक्षणाधिकारी जबाबदार असल्याचा आरोप शिक्षकवर्गाने केला आहे. शिक्षणाधिकारी संदीप संगवे यांच्या बदलीनंतर शासनाकडून प्रतिनियुक्तीवर कोणी शिक्षणाधिकारी न आल्याने सध्या नवी मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाचा अतिरिक्त कार्यभार उद्यान व क्रीडा विभागाचे उपायुक्त नितीन काळे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. त्यामुळे शिक्षणात विभागात वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या सर्व प्रकरणांचा निपटारा करण्यातच त्यांचा वेळ जात आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/PGyZcQAA

📲 Get Navi-mumbai News on Whatsapp 💬