[pune] - ऑनलाइन फसवणुकीचे पुणेकर ठरताहेत बळी

  |   Punenews

गेल्या काही दिवसांत पाच लाख रुपयांना गंडा

पुणे : आयटी हब आणि विद्येचे माहेरघर म्हणून जगभर ख्याती पावलेल्या पुणे शहरात ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. सहजासहजी कोणत्याही गोष्टीवर विश्वास न ठेवण्यासाठी ख्यातनाम असणारे पुणेकर सायबर चोरट्यांच्या आमिषांना सहज बळी पडत असल्याचे पाहून पोलिसांचे सायबर खातेही चक्रावले आहे. शहरात गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या एकापेक्षा अधिक घटनांमध्ये चोरट्यांनी पाच व्यक्तींना ऑनलाइन माध्यमातून लाखोंचा गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

घटना पहिली

'ओएलएक्स'वरून फसवणूक

औंध परिसरातील तरुणाला दुचाकी खरेदी करायची होती. त्यासाठी त्याने वेबसाइटवर स्वस्तातील दुचाकीचा शोध सुरू केला. 'ओएलएक्स'वर त्याला एक दुचाकी आवडली. त्याने जाहिरातीवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधला असता, समोरील व्यक्तीने आपण लष्करात जवान असल्याची बतावणी केली. स्वस्तात दुचाकी विक्रीचे आमिष दाखवून तरुणाला पेटीएमच्या खात्यात ८५ हजार ५०० रुपये जमा करण्यास सांगितले. तरुणाने पैसे जमा केल्यानंतर चोरट्याने मोबाइल क्रमांक बंद केला. फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर तरुणाने चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणी आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक वैशाली गलांडे तपास करीत आहेत....

फोटो - http://v.duta.us/Uow-qgAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/nRO_9wAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬