[pune] - ‘प्रतिभावंतांची उपेक्षा होऊ नये’

  |   Punenews

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'गुणी कलावंतांचा योग्य वेळी सन्मान करणे, ही काळाची गरज आहे. गुणी कलावंतांची उपेक्षा होऊ नये, त्यांच्या वाट्याला दारिद्र्याचे दशावतार येऊ नयेत, याची काळजी सरकार आणि कलाकारांच्या अनुयायांनी घ्यावी,' असे आवाहन माजी संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी केले.

संगीतोन्मेष संस्थेने किराणा घराण्याचे प्रख्यात गायक आणि प्रतिभावंत संगीतकार पं. यादवराज फड यांच्या दोन हजार मैफली संपन्न झाल्याच्या निमित्ताने डॉ. सबनीस व खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, पुष्पहार, शाल आणि श्रीफळ देऊन पं. यादवराज फड आणि वैशाली फड यांचा सत्कार करण्यात आला. नगरसेवक मुरलीधर मोहोळ, ओमप्रकाश पेठे, चंद्रकांत महाराज वांजले, सागर शेडगे, योगेश ढगे, नगरसेविका वासंती जाधव आदी उपस्थित होते....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/AUj3oQAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬