[pune] - प्रभात रस्त्यावर मोबाइल लांबवला

  |   Punenews

म. टा. प्रतिनिधी, पुणे

प्रभात रस्त्यावर ऑनलाइन कार बुक करण्यासाठी थांबलेल्याचा मोबाइल दुचाकीस्वार चोरट्यांनी पळविल्याची घटना शनिवारी रात्री घडली. या प्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संदेश भळगट (वय ३३, रा. चिंचवड) यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, दुचाकीवरील दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार मामांना भेटण्यासाठी प्रभात रस्ता परिसरात आले होते. भेट झाल्यानंतर रात्री साडेनऊच्या सुमारास ते परत जाण्यासाठी स्वरूप अपार्टमेंट समोर आले. रस्त्यावर उभे राहून कार बुक करण्यासाठी त्यांनी मोबाइल हातात घेतला. त्या वेळी पाठीमागून भरधाव दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या हातातील मोबाइल जबरदस्तीने हिसका मारून चोरून नेला. संदेश यांनी आरडाओरडा केला. घटनेची माहिती मिळताच डेक्कन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या परिसरातील सीसीटीव्हींची पडताळणी करण्यात येत असून, त्यानुसार चोरट्यांचा माग काढला जात आहे. उपनिरीक्षक बी. डी. मेटे तपास करत आहेत....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/1OZ_rwAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬