[pune] - वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू

  |   Punenews

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कोंढवा परिसरातील बोपदेव घाटात भरधाव वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय रामचंद्र शेंडकर (रा. चांबळी, ता. पुरंदर) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत नाना बबन शेंडकर यांनी तक्रार दिली आहे. आठ सप्टेंबरला हा अपघात झाला होता. पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, दुचाकीस्वार शेंडकर मध्यरात्री बाराच्या सुमारास बोपदेव घाटातून सासवडला जात होते. त्या वेळी भरधाव वाहनाने वळणावर दुचाकीस्वार शेंडकर यांना धडक दिली. अपघातानंतर दुचाकीस्वार पसार झाला. शेंडकर यांनी याबाबत सासवड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर अपघाताचा गुन्हा शहर पोलिसांकडे तपासासाठी वर्ग करण्यात आला. या प्रकरणी कोंढवा पोलिस अधिक तपास करत आहेत.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/_loJbAAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬