[thane] - ग्रामीण पर्यटनक्षेत्रांचा विकास

  |   Thanenews

अंबरनाथ, शहापूर आणि भिवंडीसाठी दीड कोटी; कोंडेश्वरला संरक्षण भिंत

माहुली गडाच्या पायथ्याशी सांस्कृतिक केंद्र; मलंगगड पायथ्याशी निवारा केंद्र

म. टा. प्रतिनिधी, ठाणे

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्य ग्रामविकास विभागाकडून दीड कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला असून मलंगगड, माहुली किल्ला, कोंडेश्वर, अकलोली कुंड परिसरात विविध सुविधांची उपलब्धता करून देण्यात येणार आहे. अंबरनाथच्या कोंडेश्वर परिसरात संरक्षण भिंत, मलंगगड परिसरात निवारा केंद्र, प्रसाधनगृह, शौचालये आणि रस्त्याच्या सुविधा करून देण्यात येणार आहेत. तर शहापूरमधील माहुली गडाच्या पायथ्याशी सांस्कृतिक केंद्र, खारबांव येथील कालिका माता मंदिराचे सुशोभिकरण आणि अकलोली कुंडांच्या परिसरात स्नानगृहे व चेंजिंग रूमसह रस्ते विकास केला जाणार आहे.

कोकणातील ग्रामीण भागातील भूमिपुत्रांना त्यांच्या गावात रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने कोकणातील विकास कामांची गती वाढवण्यात आली आहे. ग्रामीण भागातील पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटनस्थळांच्या परिसरात पायाभूत सुविधांची उपलब्धता करण्यासाठी ही योजना तयार करण्यात आली आहे. याच अनुषंगाने ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीने कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमातून अंबरनाथ, शहापूर आणि भिवंडी तालुक्याचा प्रस्ताव सादर केला होता. ग्रामविकास विभागाकडून त्याला मंजुरी मिळाली असून १५० लाखांचा निधी वितरित करण्यात आला आहे. यामध्ये हाजीमलंग गडाच्या परिसरात फेनिक्युलर तयार होत असून या स्थानकापासून ते ऑस्टेलियन टाकीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रिटीकरण केले जाणार आहे. येथील आदिवासी वाडी, मलंगरोडवर शौचालय बांदणे, तसेच गडाच्या पायथ्याशी असलेल्या शिवमंदिर परिसरात निवाराकेंद्राची कामे घेतली जाणार आहे. तर अंबरनाथ येथील कोंडेश्वर येथे संरक्षण भिंत तयार करणे आणि धामणवाडी ते कोंडेश्वर रस्त्याचे क्रीटकरण करण्यात येणार आहे. याशिवाय शहापूर तालक्यातील माहुली गडाच्या पायथ्याशी सांस्कृतिक केंद्र उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. भिवंडीतील खारबांव येथील कालिका माता मंदिराचे सुशोभिकरणही यातून होणार आहे. तर अकोलली कुंडांच्या लगत स्नानगृहे आणि चेंजिंग रूम बांधण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/w1ZPYgAA

📲 Get Thane News on Whatsapp 💬