[thane] - महागड्या बाइकसह अल्पवयीन चोराला ताब्यात

  |   Thanenews

म. टा. प्रतिनिधी, ठाणे

बीएमडब्ल्यू कंपनीच्या महागड्या बाइकसह एका अल्पवयीन मुलाला कासारवडवली पोलिसांनी ताब्यात घेतले असून ही बाइक चोरीची असल्याची बाब चौकशीतून पुढे आली आहे. या प्रकरणी विष्णूनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आतापर्यंत पोलिसांनी अन्य एका आरोपीला अटक केली आहे. तर, त्यांचा साथीदार फरार आहे. कासारवडवली पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी घोडबंदर रोडवरील रविवारी रात्री गस्त घालत असताना एक संशयास्पद मोटारसायकस्वार पोलिसांना दिसला. तत्काळ या मोटरसायकलस्वाराला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर कल्याणच्या आंबिवली भागात राहणारा हा आरोपी १६ वर्षांचा असल्याचे निष्पन्न झाले. बीएमडब्ल्यू कंपनीची असलेल्या या स्पोर्ट्स बाइकची किंमत तीन लाख ८० हजार रुपये असून त्याने ती साथीदारांच्या मदतीने चोरी केल्याचे समोर आली आहे. या आरोपीला पुढील चौकशीसाठी विष्णूनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. त्याचे अन्य दोन साथीदार असून तिघांची ही टोळी असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली. १९ वर्षाच्या आणखीन एका युवकाला अटक केली असून अद्याप एक आरोपी फरार आहे.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/Ll1MxwAA

📲 Get Thane News on Whatsapp 💬