[thane] - महापालिकेतच महिलेची प्रसूती

  |   Thanenews

उपजिल्हा रुग्णालयाची वाट चुकल्याने गोंधळ

म. टा. वृत्तसेवा, पनवेल

नव्याने स्थापन झालेले पनवेल उपजिल्हा रुग्णालय समजून महापालिकेच्या मुख्यालयात प्रसूतीकळा घेऊन आलेल्या महिलेची प्रसूती महापालिकेत झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी पनवेलमध्ये घडली. अनिला समीर ठाक असे प्रसूती झालेल्या महिलेचे नाव आहे.

पनवेल शहरात राहणारी अनिला समीर ठाक ही महिला शनिवारी पहाटे प्रसूतीकळा सुरू झाल्याने नवऱ्याबरोबर घाईघाईत रिक्षाने रुग्णालयात निघाली. रिक्षाचालकास पालिका रुग्णालय असे सांगितल्यामुळे अशा प्रकारचे रुग्णालय पनवेलमध्ये नसल्यामुळे रिक्षाचालकाने थेट पनवेल महापालिकेच्या मुख्यालयासमोर रिक्षा नेली. रिक्षा थांबल्यानंतर प्रसूतीवेदना होणाऱ्या महिलेने घाईघाईत थेट महापालिका मुख्यालयाच्या नवीन इमारतीच्या पायऱ्या चढण्यास सुरुवात केली. उपस्थित सुरक्षारक्षकाने हे रुग्णालय नाही, आपण कुठे निघाला आहात अशी विचारणाही केली. मात्र महिला घाईघाईने पुढे जात असतानाच तिची प्रसूती झाली. त्यानंतर पतीने तातडीने रुग्णालयात जाऊन घडलेला प्रकार सांगितला. उपजिल्हा रुग्णालयातील सुरक्षारक्षक जीवन कोंडीलकर यांनी तातडीने १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला संपर्क साधला. मात्र गाडी उपलब्ध होवू न शकल्यामुळे स्वत:ची गाडी घेऊन महापालिकेच्या मुख्यालयातून महिला आणि नवजात बालकाला घेऊन रुग्णालयात नेले. रुग्णालयातील कर्माचाऱ्यांनी आई आणि बाळावर उपचार केल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नागनाथ यमपल्ले यांनी सांगितले....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/N2H-LQAA

📲 Get Thane News on Whatsapp 💬