[thane] - सीएनजी पंपावरील दरोड्याचा डाव उधळला

  |   Thanenews

चौघांना अटक, एक फरार

म. टा. प्रतिनिधी, ठाणे

घोडबंदर रोडवरील सीएनजी पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चौघांना कासारवडवली पोलिसांनी अटक केली असून त्याचा एक साथीदार फरार आहे. दरोडेखोरांकडून खेळण्यातील एक रिव्हॉल्वर, मिरची पूड, दोरी, चाकू आदी साहित्य हस्तगत करण्यात आले असून न्यायालयाने आरोपींना मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.

शोएब खान (२६), कुशाल पुजारी (१९), बालाजी कोळगिरे (१९), साहिल शेख (१९) अशी या आरोपींची नावे असून सर्वजण काशिमिरा भागात राहतात. हे आरोपी बाबू या साथीदारासह घोडबंदर रोडवरील सीएनजी पेट्रोल पंपावर दरोड्याच्या पाहसाठी शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजता मोटारसायकलवरून आले होते. ही माहिती कासारवडवली पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ धाव घेत गायमुख बसथांब्याच्या आसपास सापळा लावला. यावेळी घोडबंदरकडून दोन मोटारसायकलवर आलेले पाच जण येथील बसथांब्याजवळ थांबले. सर्वजण एकमेकांमध्ये बोलत असताना चौघांना पकडण्यात पोलिसांना यश आले. तर, एकजण पळून जाण्यास यशस्वी झाला. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांना बळाचाही वापर करावा लागला होता. यावेळी शोएबकडे खेळण्यातील प्लास्टिकचे रिव्हॉल्वर मिळाले असून इतरही आरोपींकडे दरोडा टाकण्यासाठी लागणारे साहित्य होते. आरोपींच्या चौकशीत शोएब तसेच त्याचे साथीदार पंपावर दरोडा घालण्याच्या पूर्वतयारीत असल्याची माहिती पुढे आली.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/lAnohwAA

📲 Get Thane News on Whatsapp 💬