Vidhan Sabha 2019 : युतीमध्ये शिवसेनेला अकोल्यातील एकच मतदारसंघ मिळण्याची शक्यता!

  |   Akolanews

लोकमत न्यूज नेटवर्क

अकोला: विधानसभा निवडणुकीसाठीच्या मोर्चेबांधणीचे राजकारण आता वेगाने फिरू लागले आहे. भाजप-सेना युतीची बोलणी अंतिम टप्प्यात असून, युतीमध्ये सेनेला अकोल्यातील एकच मतदारसंघ मिळणार असल्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. सोमवारी मुंबईत भाजप पार्लमेंटरी बोर्डची बैठक होत आहे. या बैठकीत सेनेला कोणते मतदारसंघ सोडणार, याची चर्चा अपेक्षित असल्याने सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईत धाव घेतली आहे.

२०१४ च्या मोदी लाटेत भाजपाने अकोल्यात चार मतदारसंघ जिंकून सेनेला मागे टाकले. त्यामुळे आता या चार मतदारसंघांव्यतिरिक्त उरलेला एकमेव बाळापूर हाच मतदारसंघ सेनेला देण्याची शक्यता आहे. सेनेचा दोन मतदारसंघांवर दावा असून, मूर्तिजापूर मतदारसंघात सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजप आमदार हरीश पिंपळे यांच्याविरोधात बैठकांचे सत्र सुरू केले आहे. भाजपाचे पिंपळे पुन्हा आमदार नको, असा शिवसैनिकांचा आग्रह असल्याने या मतदारसंघाबाबतही युतीमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपच्या पार्लमेंटरी बोर्डच्या बैठकीत जागा वाटपाबाबत काय धोरण ठरते, याकडे भाजपसह शिवसैनिकांचेही लक्ष लागलेले आहे....

फोटो - http://v.duta.us/CMUT6AAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/TEtrxQAA

📲 Get Akolanews on Whatsapp 💬