तिसवाडी, फोंड्याला ‘ओपा’तून गढूळ पाणी

  |   Goanews

पणजी : प्रतिनिधी

पणजी आणि परिसरातील लोकांना ऑगस्ट महिन्यात सुमारे सात दिवस पाण्यावाचून काढावे लागले, त्याला महिनाही व्हायच्या आधी ओपाहून तिसवाडी व फोंडा तालुक्याला गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने गृहिणींनी संताप व्यक्‍त केला आहे.

ओपा जलप्रकल्पात पावसाळ्यात पश्‍चिम घाटातून खनिज मिश्रीत पाण्याचा पुरवठा होत असतो. मात्र, गेले चार दिवस खांडेपार नदीचे पाणी फारच गढूळ बनले असल्याने प्रकल्पातील ‘फिल्टर्स’ भरलेले आहेत. ओपा प्रकल्पात दाखल होणार्‍या पाण्याची चाचणी घेतली असता मंगळवारी (दि.3) गढूळतेचे प्रमाण 45 ‘एनटीयु’ तर बुधवारी (दि.4) हेच प्रमाणा 182 एनटीयु मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले.

पाण्यात खनिजाचे प्रमाण वाढल्याने ओपा जलप्रकल्पातील फिल्टर्स गच्च झाले असून ते साफ करण्यासाठी हजारो रुपये खर्च येणार आहे. ओपा प्रकल्पात सध्या 21 विविध आकाराचे फिल्टर्स बसवण्यात आले असून ते एकामागोमाग साफ करण्याचा उद्योग खात्याच्या कर्मचार्‍यांना करावा लागत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

फोटो - http://www.pudhari.news/news/Goa/Thirdly-Fonda-boiled-water-from-Opa/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://www.pudhari.news/news/Goa/Thirdly-Fonda-boiled-water-from-Opa/

📲 Get goanews on Whatsapp 💬