देखावे पाहण्यासाठी सातारकर नेहमीच आतूर

  |   Sataranews

सातारा : प्रतिनिधी

गणेशोत्सवात विविध देखावे पाहण्यास मिळणार म्हणून सातारकर वर्षभर आतुर असतात. चौकाचौकात साकारले जाणारे देखावे पाहण्यासाठी शहर व उपनगरातील लोक आवर्जून सातार्‍यात येतात. यंदा विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असले तरी पूरस्थितीमुळे अनेक मंडळांनी देखावे रद्द केले आहेत. यामुळे गणेशभक्‍तांना यंदा सातार्‍यात मनासारखे देखावे पहायला मिळण्याची शक्यता धूसर आहे.

पारंपरिक देखावे पाहण्यासाठी शाहूनगरीतील गणेशभक्‍तांची नेहमीच गर्दी होत असते. गणेशोत्सवातील शेवटच्या चार दिवसात रात्री आठ वाजल्यापासून देखावे पाहण्यासाठी तसेच सजावट पाहण्यासाठी नागरिक रस्त्यावरुन फिरत असतात. परंतु, यावर्षी गणेशभक्‍तांना अपेक्षित देखावे कितपत पहायला मिळतील, याबाबत शंका आहे. असे असले तरी आकर्षक सजावट, डोळे दीपवणारी रोषणाई गणेशभक्‍तांचे आकर्षण ठरणार आहे.

पूरग्रस्त व दुष्काळग्रस्तांना मदत करणे, अपंगांना मदत देणे आदीसह विविध सामाजिक उपक्रमांकडे मंडळांचा कल वाढल्याने देखाव्यांचे प्रमाण कमी झाल्याचे कार्यकर्तेच सांगत आहेत. यावर्षी सजावट, रोषणवाईवर कमी खर्च करुन अनेक मंडळांनी पूरग्रस्त नागरिकांना मदतीचाही हात पुढे केला आहे. सध्या सार्वजनिक मंडळांपुढे कार्यकर्त्यांची उणीव मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. अनेक युवक नोकरीनिमित्त बाहेर असल्याने तसेच सुट्टयाही मिळत नसल्याने कार्यकर्त्यांना मंडळासाठी पुर्णवेळ देणे शक्य होत नाही. एकंदरीत कार्यकर्त्यांची कमतरतेमुळे भव्य देखाव्यांची परंपरा लोप पावल्याचे काहीजण बोलून दाखवत आहेत....

फोटो - http://www.pudhari.news/news/Satara/satarkar-is-always-inside-to-see-the-scenery/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://www.pudhari.news/news/Satara/satarkar-is-always-inside-to-see-the-scenery/

📲 Get Satara News on Whatsapp 💬