पर्यावरणपूरक विसर्जनही व्हावे

  |   Sataranews

योगेश चौगुले

श्री गणेश सर्वांचे लाडके आराध्य दैवत असल्यानेच गणेशोत्सव काळात सगळी सृष्टी चैतन्यमय होते. कार्यारंभी गणेशपूजनाची प्रथा आहे. गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील महत्वाचा सण आहे. भाद्रपदातील चतुर्थीला वाजत गाजत गणरायाचे आगमन होते आणि पुढील दहा दिवस बाप्पा घरात विराजमान होतात. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक रुप दिले. गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाज एकत्र यावा, विचारांची देवाण - घेवाण व्हावी, समाज प्रबोधन व्हावे हा त्या मागचा उद्देश होता. लोकांनी त्यांच्या हाकेला उदंड प्रतिसाद दिला. लोकं घरात आणि मंडळात दोन्ही ठिकाणी गणेशोत्सव उत्साहात साजरा करु लागली.

सामाजिक बदल हा विचारांच्या बदलांनी घडून येतो. विचार बदलले उत्सव साजरे करण्याची पद्धत बदलत गेली. हा उत्सव भव्य स्वरुपात साजरा करण्यासाठी चढाओढ निर्माण झाली. माझी मूर्ती जास्त भव्य, आकर्षक असावी असे प्रत्येकाला वाटू लागले. सुबकता व रेखीवता यापेक्षा भव्यतेला महत्व दिले जावू लागले. या संघर्षात माती आणि शाडूच्या मूर्तीर्ंंची जागा प्लास्टर ऑफ पॅरिसने कधी घेतली हे समजलेच नाही. आकर्षक रासायनिक रंग, उंचच्या उंच गणेशमूर्ती सर्वत्र दिसू लागल्या.आता या मूतीर्र् विसर्जित कुठे करायच्या? नदी, तलाव, समुद्र असे मोठे मोठे जलसाठे आहेतच....

फोटो - http://www.pudhari.news/news/Satara/There-should-also-be-environmentally-ganesh-immersion/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://www.pudhari.news/news/Satara/There-should-also-be-environmentally-ganesh-immersion/

📲 Get Satara News on Whatsapp 💬