मंडल अधिकार्‍यासह दोघांना अटक

  |   Sanglinews

सांगली / पलूस : प्रतिनिधी

जमिनीची फेरफार नोंद मंजूर करण्यासाठी खासगी उमेदवारामार्फत आठ हजारांची लाच स्वीकारणार्‍या पलूस येथील मंडल अधिकार्‍यासह दोघांना अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पलूसच्या तहसील कार्यालयाच्या आवारात गुरुवारी दुपारी ही कारवाई केली.

मंडल अधिकारी सैपन हसन जातगार (वय 49, रा. उमराणी, ता. जत) व एजंट युवराज बाळासाहेब जाधव (36, पलूस) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध पलूस पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार पलूसमधील आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी जमीन खरेदी केली आहे. या जमिनीचा फेरफार नोंद मंजूर करण्यासाठी त्यांनी तलाठी कार्यालयातील मंडल अधिकारी जातगार यांची भेट घेतली.

जातगार याने दहा हजार रुपयांची मागणी केली. चर्चेअंती आठ हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली. या विभागातील पथकाने तक्रारीची चौकशी केली. यामध्ये जातगार याने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्‍न झाले....

फोटो - http://www.pudhari.news/news/Sangli/two-Arrested-with-a-Circle-Officer-in-bribe-case/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://www.pudhari.news/news/Sangli/two-Arrested-with-a-Circle-Officer-in-bribe-case/

📲 Get Sanglinews on Whatsapp 💬