‘म्हैसाळ टप्प्या’ला महापुराचा दणका

  |   Sanglinews

लिंगनूर : प्रवीण जगताप

कृष्णा नदीकाठ महापुराने बाधित झाला होता आणि याच महापुराच्या संकटाने कृष्णा नदीचे पाणी उचलून जिल्ह्यातील दुष्काळी भागात नेणार्‍या महत्वाकांक्षी म्हैसाळ योजनेच्या पहिल्या टप्प्यालाही पुरते बेहाल केले आहे.

महापुरानंतर आता वीस दिवस झाले तरी पहिला टप्पा अजून पूर्णपणे दुरूस्त झालेला नाही. योजना कधीही सुरू करता येईल, पण त्यासाठी म्हैसाळ योजनेचा पहिला टप्पा सज्ज हवा. हा पहिला टप्पाच महापुराने बाधित झाला आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील मोठ्या विद्युत मोटारी, लहान मोटारी, पंप, पंपगृह, व्हॉल्व फ्लोअर या सर्व ठिकाणी महापूरकाळातील पाण्याने आणि चिखल, कचर्‍याने पंपाची स्थितीही पूरग्रस्त होऊन बसली आहे.

याबाबत म्हैसाळ योजनेच्या पहिल्या टप्प्यातील सिव्हिल विभागाचे शाखा अभियंता करे म्हणाले, महापूर ओसरल्यावर दि. 12 ऑगस्टपासूनच पहिल्या टप्प्यातील स्वच्छता आणि दुरूस्ती सुरू झाली आहे. पुरामुळे तळातील व्हॉल्व्ह फ्लोअरमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ, कचरा, चगाळ साठले होते. पंपाच्या खालीही लाकडी ओंडके आणि कचरा साठला होता. तो गाळ आणि कचरा काढण्याचे काम सुरू होते. चिखल वाळत जाईल तशी स्वच्छता करावी लागली आहे. आता स्वच्छता पूर्ण झाली आहे....

फोटो - http://www.pudhari.news/news/Sangli/Damage-to-building-of-Mhaisal-scheme-due-to-floods-in-mhaisal-miraj/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://www.pudhari.news/news/Sangli/Damage-to-building-of-Mhaisal-scheme-due-to-floods-in-mhaisal-miraj/

📲 Get Sanglinews on Whatsapp 💬