राष्ट्रवादीची पुण्यात महत्वाची बैठक, छगन भुजबळ बैठकीला येणार का?

  |   Maharashtranews

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्वपूर्ण बैठक आज पुण्यात होत आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचं निवासस्थान असलेल्या ‘वन मोदीबाग’ याठिकाणी ही बैठक होत आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, ज्येष्ठ नेते दिलिप वळसे पाटील, सुनील तटकरे, खासदार अमोल कोल्हे या बैठकीसाठी उपस्थित असणार आहेत.

महत्वाचे म्हणजे पक्ष सोडणार असल्याची चर्चा सुरु असलेले ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे देखील या बैठकीसाठी येणार असल्याचे बोलले जात आहे. प्रत्यक्षात ते येतात का याबद्दल उत्सुकता आहे. दरम्यान, काल राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भुजबळ हे राष्ट्रवादीतच राहतील, असे सांगत ते पक्ष सोडूणार जाणार नाहीत, असा विश्वास व्यक्त केला. त्यामुळे या बैठकीला भुजबळ उपस्थित राहतात का, याचीच उत्सुकता आहे. भुजबळ यांनी नाशिकमधील शिवसेनेच्या एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यामुळे ते शिवसेनेत जाणार अशीच चर्चा होती. तसेच याआधीही सुप्रिया सुळे यांनी त्यांच्याशी संपर्क केला असता त्यावेळी त्यांचा फोन नॉट रिचेबल होता. ही माहिती सुप्रिया यांनीच मीडियाला दिली होती. त्यामुळे भुजबळ येणार की दांडी मारणार याची उत्सुकता आहे....

फोटो - http://v.duta.us/5CjaIQAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/2mhvqQAA

📲 Get maharashtranews on Whatsapp 💬