लढत आघाडी-महायुतीमध्येच होणार

  |   Sanglinews

चिंतामणी सहस्रबुद्धे

सांगली जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचे वातावरण आता तापू लागले आहे. जिल्ह्यात विधानसभेचे आठ मतदारसंघ आहेत. त्या आठही मतदारसंघांत भाजप-शिवसेना महायुती विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी अशीच प्रामुख्याने लढत होणार आहे. लोकसभा निवडणुकीत भक्‍कम मते मिळाल्यामुळे वंचित बहुजन आघाडीमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. या आघाडीचेही किमान दोन ते तीन मतदारसंघांत आव्हान राहणार आहे. मात्र, तो काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्याच चिंतेचा विषय ठरणार आहे. महापुराचा बसलेला फटका आणि पाण्यापासून वंचित पूर्व भाग हे मुद्देही या निवडणुकीत महत्त्वाचे ठरणार आहेत.

सांगली, मिरज, इस्लामपूर, शिराळा, पलूस-कडेगाव, खानापूर-आटपाडी, तासगाव-कवठेमहांकाळ आणि जत असे जिल्ह्यात आठ मतदारसंघ आहेत. त्यापैकी सांगली- सुधीर गाडगीळ, मिरज- सुरेश खाडे, जत- विलासराव जगताप आणि शिराळा- शिवाजीराव नाईक असे भाजपचे आमदार आहेत. खानापूर-आटपाडीत शिवसेनेचे अनिल बाबर आमदार आहेत. इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आमदार आहेत. तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात राष्ट्रवादीच्या सुमनताई पाटील आणि पलूस-कडेगाव मतदारसंघात काँग्रेसचे डॉ. विश्‍वजित कदम आमदार आहेत....

फोटो - http://www.pudhari.news/news/Sangli/The-fight-will-take-place-in-the-Alliance-Mahayuti/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://www.pudhari.news/news/Sangli/The-fight-will-take-place-in-the-Alliance-Mahayuti/

📲 Get Sanglinews on Whatsapp 💬