शिराळा : वारणा नदीवरील चार पूल पाण्याखाली

  |   Sanglinews

शिराळा : प्रतिनिधी

शिराळा तालुक्यात पावसाचा जोर वाढला असून वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. नदी काठची पिके पुन्हा पाण्याखाली गेली आहेत. चांदोली धरण व परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चांदोली धरणातून प्रती सेंकद 14851 क्युसेक वारणा नदी सोडण्यात येत आहे. त्यामुळे वारणा नदीच्या पाण्यात झपाट्याने वाढ होत आहे. वारणावती येथे 78 मीमी पाऊस झाला आहे.

वारणा नदीवरील चार पूल पाण्याखाली गेल्यामुळे या मार्गावरील कोल्हापूर जिल्ह्यातील वाहतूक बंद झाली. आरळा शित्तूर, चरण सोंडोली, कोकरूड रेठरे, काखे मांगले या पूलावर पाणी आहे. नदी काठाच्या सर्व गावांना तहसीलदार गणेश शिंदे यांनी सतर्कतेचा इशारा दिला. डोगर कडा, दरडी कोसळण्याची शक्यता ओळखून आरळा भाष्टेवाडी येथील आकरा कुंटूंबाचे स्थलांतर करण्यात आले आहे....

फोटो - http://www.pudhari.news/news/Sangli/Rainfall-increased-in-Shirala-tehsil/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://www.pudhari.news/news/Sangli/Rainfall-increased-in-Shirala-tehsil/

📲 Get Sanglinews on Whatsapp 💬