सांगली : कृष्णेची पातळी २८ फुटांवर; स्थलांतराची सूचना

  |   Sanglinews

सांगली : प्रतिनिधी

गेल्या महिन्यात कृष्णा नदीला आलेल्या महापुरातून अजून सांगलीकर सावरलेले नाहीत. तोपर्यंतच पुन्हा महापुराचा धोका निर्माण झाला आहे. सांगलीत गुरुवारी रात्री पाणीपातळी 28 फुटांवर पोहोचली होती. शुक्रवारी पाणी शिरण्याची शक्यता असल्याने नदीकाठावरील सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट, मगरमच्छ कॉलनीतील नागरिकांना महापालिका प्रशासनाने स्थलांतराच्या सूचना दिल्या आहेत.

दि. 27 जुलै ते 10 ऑगस्ट या कालावधीत संपूर्ण सांगली, मिरज महापुराच्या सावटाखाली होते. सुमारे 50 हजारांपेक्षा अधिक कुटुंबांना स्थलांतर व्हावे लागले होतेे. त्यामुळे सांगलीच्या बाजारपेठा, घरे, संसार उद्ध्वस्त झाली. महापालिका क्षेत्रातील सुमारे 500 पेक्षा अधिक घरे जमीनदोस्त झाली. महापुराच्या धक्क्याने झालेल्या नुकसानीमुळे सांगली 5 वर्षे पिछाडीवर गेली आहे. घरे, दुकानांची

सावरासावर करून व्यापारी, नागरिक पुन्हा नव्याने सुरुवात करीत आहेत. गणेशोत्सवामुळे आनंदाचे वातावर आहे. त्यातच पुन्हा गेल्या दोन दिवसांत सांगलीत पाणीपातळीने तब्बल 18 फूट उसळी घेतली. बुधवारी दहा फुटावरून गुरुवारी पाणीपातळी तब्बल 28 फुटावर पोहोचली. त्यामुळे पुन्हा सांगली महापुराच्या सावटाखाली आली आहे....

फोटो - http://www.pudhari.news/news/Sangli/Krishna-rivers-level-at-28-feet-in-sangli-The-Municipal-Administration-has-given-the-instructions-for-migration/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://www.pudhari.news/news/Sangli/Krishna-rivers-level-at-28-feet-in-sangli-The-Municipal-Administration-has-given-the-instructions-for-migration/

📲 Get Sanglinews on Whatsapp 💬