सातारा जिल्ह्यातही कडकनाथचा घोटाळा

  |   Sataranews

सातारा : प्रतिनिधी

खटाव, माणसह जिल्ह्यातील सुमारे 75 शेतकर्‍यांची कडकनाथ या कोंबडी प्रकल्पाच्या माध्यमातून अडीच कोटी रुपयांची फसवणूक झाली असून हा घोटाळा आणखी वाढण्याची शक्यता आहे. शेतकर्‍यांवर कडकनाथच्या माध्यमातून अन्याय झाला असून संशयितांवर एमपीआयडी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यासाठी सुमारे 50 शेतकरी सातारा पोलिस मुख्यालयाबाहेर जमले होते. त्यांनी जिल्हा पोलिस प्रमुख तेजस्वी सातपुते यांना निवेदनही दिले.

इस्लामपूर, सांगली येथे कडकनाथ या कोंबडीच्या माध्यमातून शेतकर्‍यांनी कमीतकमी अडीच लाखापासून ते 10 लाख रुपयांपर्यंतची रक्‍कम गुंतवलेली आहेे. सुमारे दीड वर्षापूर्वी कडकनाथ कोंबडी देवून त्याची अंडी घेण्याचे ठरले होेते. त्यानुसार शेतकर्‍यांनी कोंबडी घेवून त्याला लागणारे खाद्य, जागा व इतर खर्च करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला थोडी रक्‍कम मिळाली. यामुळे शेतकर्‍यांना विश्‍वास निर्माण झाला. पाहता पाहता सातारा जिल्ह्यातील बहुतेक शेतकर्‍यांनी त्यानुसार कडकनाथ कोंबडीमध्ये लाखो रुपयांची गुंतवणूक केली....

फोटो - http://www.pudhari.news/news/Satara/Kadaknath-scam-in-Satara-district-too/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://www.pudhari.news/news/Satara/Kadaknath-scam-in-Satara-district-too/

📲 Get Satara News on Whatsapp 💬