[Ahmednagar] - जात प्रमाणपत्रासाठी पैसे घेण्याचे रॅकेट?

  |   Ahmednagarnews

नाशिकच्या उपसंचालकासह चौघांना पाच लाखांची लाच घेताना पकडले

म. टा. प्रतिनिधी, नगर

अनुसूचित जमाती प्रवर्गाचे जातवैधता प्रमाणपत्र देण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच स्वीकारताना नाशिकचे अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपसंचालक रामचंद्र रतिलाल सोनकवडे यांच्यासह समितीचे विधी अधिकारी, दोन खासगी व्यक्ती अशा चौघांना पकडण्यात आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) नगर कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बुधवारी मध्यरात्री ही कारवाई केली. हे प्रमाणपत्र काढून घेण्यासाठी पैसे घेण्याचे रॅकेट नगरमध्ये सुरू असल्याचा संशय आहे. त्या दृष्टीने तपास केला जाणार आहे.

उपसंचालक सोनकवडे (रा. नाशिक), जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे विधी अधिकारी शिवप्रसाद मुकुंदराव काकडे (रा. नाशिक), सोनकवडे यांच्या गाडीवरील खासगी चालक विनायक उर्फ सचिन उत्तमराव महाजन, नगरमधील गंगाधर शास्त्री गुणे आयुर्वेद महाविद्यालयाचा लॅबबॉय मच्छिंद्र मारुती गायकवाड या चौघांना पकडण्यात आले आहे. गायकवाड व महाजन या दोघांनी लाचेची रक्कम स्वीकारली आहे. मूळची नगरची असलेली व सध्या पुणे येथे राहत असलेल्या आदिवासी समाजातील महिलेच्या नावावर एक पेट्रोलपंप मंजूर झाला आहे. या पंपासाठी जातवैधता प्रमाणपत्र आवश्यक होते. त्यासाठी महिलेकडून जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अर्ज करण्यात आला होता. त्यासाठी पुण्यातील धनकवडी येथील एक पेट्रोलपंप व्यावसायिक या महिलेला मदत करत होता. हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी नगरमधील गायकवाड व प्रमाणपत्रासाठी महिलेला मदत करणारे हे दोघे व्यक्ती संपर्कात आले होते. प्रमाणपत्र मिळविण्यासाठी गायकवाडने पाच लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले होते. संबंधित व्यक्तीने लाचेची रक्कम न देता नगरच्या एसीबी कार्यालयात तक्रार केली. त्यानुसार बुधवारी पडताळणी कारवाई करण्यात आली. त्यात गायकवाड तक्रारदार व्यक्तीला घेऊन शिर्डीला गेला होता. त्या ठिकाणी उपसंचालक सोनकवडे, विधी अधिकारी काकडे यांच्याशी लाच देण्याबाबत चर्चा झाली. ही रक्कम सोनकवडे यांच्या खासगी वाहनचालकाकडे बुधवारी रात्रीच द्यायची ठरले होते. त्यानुसार एसीबीचे पोलिस उपअधीक्षक हरिश खेडकर, पोलिस निरीक्षक श्याम पवरे, दीपक करंडे, कर्मचारी तन्वीर शेख, प्रशांत जाधव, रमेश चौधरी यांच्या पथकाने सापळा रचून बुधवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास शिर्डीतील हॉटेल साई आसराच्या पार्किंगमध्ये वाहनचालक महाजन व गायकवाड या दोघांना लाचेची रक्कम घेताना पकडले; तसेच हॉटेलमध्ये थांबलेल्या उपसंचालक, विधी अधिकारी यांनाही पकडले. त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/B-s2oQAA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬