[Ahmednagar] - मतदान बरोबर होतंय ना?

  |   Ahmednagarnews

'ईव्हीएम'बाबत असणाऱ्या शंकांचे निरसन करण्याची संधी

म. टा. प्रतिनिधी, नगर

मतदान यंत्रावर ज्या चिन्हासमोरील बटण दाबतोय, तेच चिन्ह व्हीव्हीपॅट यंत्रावर दिसतेय का, आपले मतदान बरोबर झाले ना... यांसह ईव्हीएमबाबत असणाऱ्या इतर शंकांचे निरसन करण्याची संधी गुरुवारपासून (५ सप्टेंबर) मतदारांना मिळू लागली आहे. जिल्हा निवडणूक शाखेने निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आगामी विधानसभा निवडणुकीत मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या 'ईव्हीएम'बाबत जनजागृती मोहीम गुरुवारी जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघात सुरू केली. त्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात दोन जनजागृती रथांचे नियोजनही करण्यात आले आहे.

या निवडणुकीसाठी आवश्‍यक असलेले ईव्हीएम, व्हीव्हीपॅट जिल्ह्यात दाखल झाले असून, त्यांची प्रथमस्तरीय तपासणी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या नियंत्रणाखाली करण्यात आली आहे; तसेच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमोर मिळालेल्या मतदानयंत्रांपैकी पाच टक्के मतदानयंत्रांवर अभिरूप मतदान घेण्यात आले. आता निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदारांच्या माहितीसाठी मतदानयंत्रांचे प्रात्यक्षिक जिल्ह्यातील बाराही मतदारसंघात गुरुवारपासून सुरू करण्यात आले आहे. महाविद्यालये, मतदारसंघातील गावांमधील गर्दीची ठिकाणे, अशा विविध ठिकाणी प्रात्यक्षिक दाखवण्यात येणार आहे. प्रात्यक्षिक चालू असताना अभिरूप मतदानसुद्धा घेण्यात येणार आहे. त्यासाठी ईव्हीएमवर राजकीय पक्षांच्या चिन्हांऐवजी गणित विषयातील सांकेतिक चिन्हांचा वापर केला आहे. प्रात्यक्षिकात आपण नेमके ज्या चिन्हासमोरील बटण दाबत आहोत, तेच चिन्ह व्हीव्हीपॅटवर दिसत आहे का, याची खात्रीही मतदार करीत आहेत. जवळपास २१ दिवस हे प्रात्यक्षिक सुरू राहणार असून, या काळात मतदानयंत्रांविषयी मनामध्ये असणाऱ्या शंका दूर करण्याची संधी मतदारांना मिळणार आहे....

फोटो - http://v.duta.us/gNntswAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/-78nkwAA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬