[Ahmednagar] - महिला कंडक्टरला तिकिटावरून मारहाण

  |   Ahmednagarnews

म. टा. प्रतिनिधी, नगर

बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशाला तिकीट विचारल्यानंतर वाद होऊन प्रवाशाने महिला कंडक्टरला मारहाण केली. त्यानंतर प्रवासी पळून गेला आहे. या प्रकरणी महिला कंडक्टरच्या फिर्यादीवरून अनोळखी प्रवाशाविरज्द्ध मारहाण करणे, सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा कोतवाली पोलिस स्टेशनला नोंदविण्य़ात आला आहे.

पारनेर ते नगर एसटी बसमध्ये कंडक्टर म्हणून शीतल भाऊसाहेब वैरागर ड्युटीवर होत्या. बुधवारी ही बस पारनेरकडून नगरकडे येत होती. नगर तालुक्यातील चास येथील बस स्टॉपवरून एक प्रवासी बसमध्ये बसला. बसही केडगाव बायपास येथे आल्यानंतर प्रवाशाला कंडक्टरने तिकीट काढण्याबाबत विचारणा केली. त्यावेळी दोघांमध्ये वाद झाल्यानंतर प्रवाशाने महिला कंडक्टरशी हुज्जत घालून शिवीगाळ करून मारहाण सुरू केली. चालकाने बस थांबविल्यानंतर अनोळखी प्रवासी बसमधून उतरून पळून गेला. त्यानंतर कंडक्टरने कोतवाली पोलिस स्टेशनला जाऊन अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. गेल्या आठवड्यात बसचे ड्रायव्हर, कंडक्टर यांना मारहाण करण्याच्या तीन घटना घडल्या आहेत....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/iQ39RgAA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬