[Ahmednagar] - महसूल कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू

  |   Ahmednagarnews

नगर : 'महसूल'मधील रिक्त पदे त्वरित भरावीत, लिपिक पदाचे नाव महसूल सहायक करावे, यासह विविध मागण्या सरकारने तत्त्वतः मान्य करूनदेखील अंमलबजावणीचा निर्णय होत नसल्याने गुरुवारपासून (५ सप्टेंबर) पासून महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने बेमुदत संप सुरू केला आहे. या संपामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासह, प्रांत, तहसील कार्यालयातील कामकाज ठप्प झाले आहे.

विविध मागण्यांकडे महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना मागील अनेक दिवसांपासून आंदोलन आणि निवेदनाच्या माध्यमातून राज्य सरकारचे लक्ष वेधत आहे. यापूर्वी आपल्या मागण्यांसाठी चार टप्प्यात कर्मचारी संघटनेने आंदोलन केले. संघटनेकडून करण्यात आलेल्या मागण्यांना राज्य सरकारने तत्वतः मंजुरी दिली; मात्र, त्याबाबत निर्णय होऊन अद्याप अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे २८ ऑगस्टला महसूल कर्मचाऱ्यांनी सामूहिक रजा आंदोलन केले होते. तसेच मागण्यांची दखल न घेतल्यास ५ सप्टेंबरपासून बेमुदत संपाचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार गुरुवारपासून महसूल कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू झाला. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ गुरुवारी सकाळी अकरा वाजता संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि प्रशासनातील कर्मचारी एकत्र जमले. या वेळी महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे पदाधिकारीदेखील उपस्थित होते. संघटनेच्या मागण्यांची लवकरात लवकर दखल घ्यावी, अशा भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या. संप सुरू असल्याबाबतचा फलकही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आला होता....

फोटो - http://v.duta.us/bgaW4QAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/CwMVCQAA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬