[Aurangabad-Maharashtra] - एक पडदा चित्रपटगृह ‘गुलजार’ शेवटचे !

  |   Aurangabad-Maharashtranews

औरंगाबाद: मनोरंजनाचे बहुविध पर्याय उपलब्ध झाल्यानंतर सिंगल स्क्रिन (एक पडदा) चित्रपटगृहे बंद पडली. औरंगाबाद शहरात गेल्या वर्षभरात सर्व चित्रपटगृहे बंद झाली असून एकमेव 'गुलजार' सुरू आहे. प्रेक्षकांचा प्रतिसाद नसल्याने मल्टिप्लेक्सच्या स्पर्धेत टिकण्यासाठी 'गुलजार'चा संघर्ष सुरू आहे. सद्यस्थितीत शहरात 'गुलजार' शेवटचे एक पडदा चित्रपटगृह उरले आहे.

कधी काळी दररोज 'हाउसफुल्ल' बोर्ड पाहणारे 'गुलजार' चित्रपटगृह सद्यस्थितीत प्रेक्षकांची वाट पाहत आहे. एक 'शो' पाहण्यासाठी फक्त दहा-बारा प्रेक्षक असतात. तिकीट दर अवघे ३० आणि २५ रुपये. पण, प्रेक्षक येत नसल्याने चित्रपटगृह फार दिवस चालण्याची शक्यता नाही. मनोरंजन माध्यमांचा विस्तार झाल्यानंतर एकामागोमाग एकपडदा चित्रपटगृहे बंद पडली. 'मल्टिप्लेक्स कल्चर'चा दबदबा वाढल्यानंतर शहरातील दहा एक पडदा चित्रपटगृहे सहा मल्टिप्लेक्समध्ये रुपांतरित झाली. सध्या शहरात नऊ मल्टिप्लेक्स असून नवीन दोन मल्टिप्लेक्स प्रस्तावित आहेत. अत्याधुनिक सोयीसुविधा, तंत्रज्ञान आणि चित्रपटाच्या वेळेतील लवचिकता प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. शहरात मल्टिप्लेक्सला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाल्यानंतर सिंगल स्क्रिनचा व्यवसाय घटला. नवीन इंग्रजी चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेले पैठण गेट परिसरातील 'सादिया' चित्रपटगृह जुन्या चित्रपटांवर तग धरून होते. प्रेक्षकांनी पाठ फिरवल्यानंतर 'सादिया' बंद पडले. या चित्रपटगृहात मल्टिप्लेक्स सुरू होणार आहे. शहरातील सर्वात जुने थिएटर 'स्टेट' नुकतेच बंद झाले. तर व्यावसायिक वादातून 'रॉक्सी' थिएटर पाच वर्षांपूर्वी बंद पडले. या थिएटरच्या जागेवर मोबाइल शॉपी, अभ्यासिका आणि चहाची दुकाने आहेत....

फोटो - http://v.duta.us/jpXIhwAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/ylYB2QAA

📲 Get Aurangabad-maharashtra News on Whatsapp 💬