[Aurangabad-Maharashtra] - देहदान, अन्नदान अन् पुस्तकदान!

  |   Aurangabad-Maharashtranews

आमचे वडील स्व. अच्युत जोशी यांचे वयाच्या ९२व्या वर्षी २४ ऑक्टोबर २०१५ रोजी निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे देहदान करण्यात आले. ते अत्यंत बुद्धीप्रामाण्यवादी होते. हयात असताना त्यांनी त्यांचे वर्षश्राद्ध पारंपरिक पद्धतीने न करता ज्यांना अन्नाची खरोखरीच आवश्यकता आहे, अशा व्यक्तींना अन्नदान करावे अशी इच्छा बोलून दाखवली होती. त्यानुसार त्यांचे वर्षश्राद्ध आम्ही भावंडांनी मातोश्री वृद्धाश्रमात करण्याचे ठरवले. वृद्धाश्रमातील सुमारे १४० वृद्ध स्त्री-पुरुष व जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीमध्ये मिष्टान्न भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भोजनानंतर सर्व वृद्धांना त्यांच्या दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे वाटप करण्यात आले. आम्ही दिवसभर वृद्धाश्रमात त्यांच्या सहवासात होतो. अनेक वृद्धांशी आम्ही वार्तालाप केला. त्यांच्या पूर्वायुष्यातील सुख-दु:खाचे प्रसंग जाणून घेतले. त्यांच्या सहवासातील तो दिवस सर्वांसाठीच संस्मरणीय ठरला. नंतरच्या वर्षी वडिलांच्या पुण्यतिथीला येथील एका अनाथाश्रमातील सुमारे चाळीस विद्यार्थ्यांना गोड जेवण दिले. तसेच सर्व विद्यार्थ्यांना महापुरुषांच्या जीवनावर आधारित पुस्तके भेट देण्यात आली. अशा रितीने वडिलांची इच्छा पूर्ण केल्याचे समाधान आम्हाला लाभले. त्यांच्यात खरोखर एक सुखकर्ता असल्याचे आम्हाला मनोमन वाटले. आयुष्यभर त्यांनी इतरांबाबत आपल्या मनात एक आपुलकी, चांगुलपणा जपला. हे जग सोडून ते गेले. मात्र, आपण गेल्यानंतरही आपल्या देहाचा संशोधन कामी तरी उपयोग व्हावा म्हणून देहदान केले. वर्षश्राद्धाच्या दिवशीही फक्त इतरांना दान मिळावे, हेच चिंतले. त्यांच्या अशा आशेने कुठेतरी आमच्यातही एक सुखकर्त्याचा अंश त्यांनी जागा केला....

फोटो - http://v.duta.us/nTxY3wAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/w0w4mQAA

📲 Get Aurangabad-maharashtra News on Whatsapp 💬