[Aurangabad-Maharashtra] - पालफाटा शाळा पुन्हा पडेगावला

  |   Aurangabad-Maharashtranews

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

पाच वर्षांपूर्वी फुलंब्री तालुक्यातील पालफाटा येथे स्थलांतरित झालेली शाळा पुन्हा पडेगावला स्थलांतरित करण्याच्या आदेशाला औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संजय गंगापूरवाला आणि न्या. मंगेश पाटील यांनी तात्पुरती स्थगिती दिली.

संत जनाबाई महिला विकास मंडळ संचलित संस्थेतर्फे स्वामी परमानंद गिरीजी महाराज ज्ञाकनमंदिर गुरुकुल माध्यमिक विद्यालय फुलंब्री तालुक्यातील पालफाटा येथे चालू आहे. शाळेत आठवी ते दहावीचे वर्ग चालविले जातात. या शाळेत १३० विद्यार्थी शिकत असून, त्यात मुले आणि मुलींचे प्रमाण जवळपास सारखेच आहे. या शाळेत अुनसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय आणि खुल्या प्रवर्गातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. संस्थेने शाळेसाठी जवळपास दीड एकर जागा उपलब्ध करून दिली असून त्यावर ६००० चौ.फुटाचे बांधकाम केले आहे. वर्गासाठी, कार्यालयासाठी, वाचनालयासाठी, संगणक व इत्यादीसाठी एकूण दहा खोल्या आहेत. नेहमीप्रमाणे शाळा जुन-जुलैमध्ये सुरू झाली असून विद्यार्थ्यांचे अद्यापनाचे काम चालू आहे. ही शाळा यापूर्वी पडेगाव येथे सुरू होती. शासनाने १० फेब्रुवारी २०१४च्या आदेशाद्वारे ही शाळा पालफाटा येथे स्थलांतरित करण्याची परवानगी दिली होती. २०१४पासून आजपर्यंत ही शाळा पालफाटा येथे चालू आहे. शासनाने अचानकपणे नऊ जुलै २०१९ रोजी शाळेचे पालफाटा येथील स्थलांतर रद्द करून शाळा पुन्हा पडेगाव येथे स्थलांतरित करण्याचा आदेश दिला. या आदेशाला संस्थेने आव्हान दिले. संस्थेची बाजू विठ्ठलराव जी. सलगरे यांनी मांडली.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/QBAHHwAA

📲 Get Aurangabad-maharashtra News on Whatsapp 💬