[Aurangabad-Maharashtra] - मिनी घाटीत कुपोषित मुलांसाठी वॉर्ड सुरू

  |   Aurangabad-Maharashtranews

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात सहा वर्षांखालील कुपोषित बालकांसाठी पोषण पुनर्वसन केंद्र (एनआरसी) व विषेश नवजात शिशू काळजी कक्ष (एनएनसीयू) गुरुवारपासून (५ सप्टेंबर) रुग्णसेवेत आला.

आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्नील लाळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांच्या उपस्थितीत दोन्ही कक्षांचे उद्घाटन झाले. डॉ. सुनिला लाळे, डॉ. पद्मा बकाल, डॉ. भारती नागरे, डॉ. संतोष नाईकवाडे, अधिसेविका सुरेखा नाईक, इनचार्ज रिटा खलंग्रीकर, कुसुम भालेराव, अंजली वाघ, शितल जाधव, अनिता नागरगोजे, आहारतज्ज्ञ रश्‍मी जोशी आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. भारती नागरे यांनी केले. पोषण पुनर्वसन केंद्र (एनआरसी) हे दहा बेडचे असुन यामध्ये तीव्र कुपोषित, कुपोषित आजारी बालकांना भरती करुन पूरक पोषक आहार (हाय प्रोटीन डाएट) देऊन सामान्य वजनाकडे आणण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत, असे आहारतज्ज्ञ रश्‍मी जोशी यांनी सांगितले. विषेश नवजात शिशू काळजी कक्षामध्ये (एनएनसीयु) सोळा नवजात शिशुंचे एकावेळी उपचार करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. एक किलोपेक्षा कमी वजनाच्या बाळांसाठी या कक्षात उपचार होतील, असेही सांगण्यात आले.

फोटो - http://v.duta.us/HO-NzAAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/2j1_owAA

📲 Get Aurangabad-maharashtra News on Whatsapp 💬