[Aurangabad-Maharashtra] - वीज बिलांची ८४८ कोटींची थकबाकी

  |   Aurangabad-Maharashtranews

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महावितरण औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत मराठवाड्यात मोठया प्रमाणात वीज बिलाची थकबाकी आहे. एक लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या घरगुती, व्यापारी व औद्योगिक वर्गवारीतील एकूण २४ लाख ४३ हजार ५९७ ग्राहकांकडे ८४८ कोटी रुपयांची थकबाकी आहे.थकबाकी भरण्यासाठी १८ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत एक लाख रुपये किंवा त्याच्यापेक्षा जास्त रक्कम असलेल्या वीज ग्राहकांची यादी महावितरणाने तयार केली आहे. औरंगाबाद परिमंडळात एकूण २५८१ वीज ग्राहकांकडे ८० कोटी ९५ लाख रुपये थकबाकी आहे. अशीच थकबाकी बीड, परभणी, लातूर, हिंगोली, तसेच नांदेडसह नंदूरबार, धुळे आणि जळगाव येथेही आहे. नियमित वीज बिल न भरणाऱ्या वीज ग्राहकांमुळे महावितरणाच्या वीज सेवेवर परिणाम होत आहे. एक लाख किंवा त्याच्या पेक्षा जास्त वीज बिल असलेल्या ग्राहकांनी १८ सप्टेंबरपर्यंत त्यांच्या कडील चालू व थकीत वीज बिल भरणा करावे. लाखोपती थकबाकीदारांना एसएमएसद्वारे नोटीस देऊन आवश्यक कालावधी सुद्धा पूर्ण झालेला आहे. नोटीस बजावणीची प्रक्रिया नियमानुसार असून १८ सप्टेंबरनंतर पूर्वसूचना न देता वीज पुरवठा खंडित करण्याचे आदेश महावितरणच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/nF4BTwAA

📲 Get Aurangabad-maharashtra News on Whatsapp 💬