[Jalgaon] - नंदुरबारमध्ये गणेश विसर्जनावेळी ६ तरुणांचा बुडून मृत्यू

  |   Jalgaonnews

नंदुरबार: नंदुरबार येथे पाच दिवसांच्या गणेश विसर्जनाला गालबोट लागले. विसर्जन करताना पाण्याचा अंदाज न आल्याने ६ तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून अधिक तपास करत आहेत.

नंदुरबारच्या वडछिल येथे आज सायंकाळी ही दुर्घटना घडली. पाच दिवसांच्या गणपती विसर्जनासाठी येथील नदीवर मोठी गर्दी जमली होती. गणेश विसर्जनासाठी आठ ते दहा तरुण नदीत उतरले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने नदीत बुडून सहाजण बुडाले. या घटनेची माहिती मिळताच रेस्क्यू पथक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या सहाही तरुणांचे मृतदेह बाहेर काढले. त्यांचे मृतदेह शहादा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

फोटो - http://v.duta.us/AzRI4gAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/Gxw1uQAA

📲 Get Jalgaon News on Whatsapp 💬