[Kolhapur] - कागदोपत्री पंचनामे, नुकसान मोठे

  |   Kolhapurnews

मिलिंद पांगिरेकर, गारगोटी

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अति अतिवृष्टी आणि महापुरामुळे भुदरगड तालुक्यातील २३ घरे पुर्णतः पडली तर ११३२ घरांची अंशतः पडझड झाली. या पावसाचा कूर व शेणगाव या ठिकाणी पुराचा सर्वाधिक फटका बसला येथील अधिक घरे पडली आहेत. घराच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असून तालुक्यातील १४७ पूरबाधित कुटुंबांना पाच हजार रुपये रोख व उर्वरित रक्कम खात्यावर असे १४ लाख ७० हजार रुपयाचे सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले आहे. सरकारी पातळीवर पंचनामे दाखवले जात असले तरी प्रत्यक्षात नुकसानीचा आकडा मोठा आहे.

पावसामुळे तालुक्यात ऊस पिकाचे कोट्यवधी रुपयाचे नुकसान झाले आहे. खरीप हंगामातील पिकेही पाण्याखाली गेल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. पण बऱ्याच गावात वर्षानुवर्ष देवस्थान जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांना त्या जमिनीचे पंचनामे होत नसल्याने नुकसान भरपाई मिळणार नाही, तसेच विहिरींच्या नुकसानीचे पंचनामे होत नसल्याने त्यामुळेही शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे....

फोटो - http://v.duta.us/yZvcjAAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/1vj3zQAA

📲 Get Kolhapur News on Whatsapp 💬