[Kolhapur] - माध्यमिक शिक्षक संघटनेचे आंदोलन स्थगित

  |   Kolhapurnews

कोल्हापूर : माध्यमिक शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांच्या सोडवणुकीसाठी आठवडाभरात बैठक घेण्याची ग्वाही मिळाल्यामुळे कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे. करवीरचे तहसिलदार सचिन गिरी व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक होणार असल्याचे सांगितले. यामुळे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याचे संघटनेने म्हटले आहे. शिक्षक दिनीच शिक्षकांनी आत्मक्लेश आंदोलन जाहीर केल्यामुळे ते थांबविण्यासाठी अधिकाऱ्यांच्या पातळीवर धावपळ सुरू होती. सरकारकडे अनेक वर्षे पाठपुरावा करुनही माध्यमिक शिक्षकांचे प्रश्न सोडविले नाहीत. सरकारच्या या भूमिकेच्या निषेधार्थ माध्यमिक शिक्षक संघातर्फे गुरुवारी, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कावळा नाका येथील कार्यालयासमोर आत्मक्लेश आंदोलन जाहीर केले होते. त्यानुसार दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास शिक्षक कार्यालयासमोर थांबले. याप्रसंगी पोलिसांनी मध्यस्थी केली आणि अधिकाऱ्यांशी चर्चा घडवून आणली....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/kv4JpAAA

📲 Get Kolhapur News on Whatsapp 💬