[Kolhapur] - महसूल प्रशासन विस्कळित

  |   Kolhapurnews

कोल्हापूर टाइम्स टीम

सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यांसह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या कार्यालयांतील ६०० महसूल कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले. त्यामुळे महसूल कामकाज विस्कळित झाले. दिवसभर कार्यालयात शुकशुकाट होता. राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या येथील जिल्हा शाखेच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे.

संघटनेने पूर्वी घोषित केल्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयासह तालुका पातळीवरील सुमारे ६०० महसूल कर्मचारी काम बंद आंदोलनात सहभागी झाले. जिल्हाधिकारी कार्यालयातील आंदोलनातील कर्मचारी नेहमीप्रमाणे सकाळी कामावर आले. मात्र, कर्मचारी कार्यालयात न जाता प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेल्या मंडपात एकत्र आले. तेथे त्यांनी दुपारपर्यंत ठिय्या मारला. करवीर, हातकणंगले या तालुक्यांसह जवळपासचे कर्मचारीही येथील ठिय्या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. प्रामुख्याने पदोन्नतीने झालेले नायब तहसीलदार, सर्व अव्वल कारकून, चालक, शिपाई आणि पदोन्नतीने झालेले मंडल अधिकारी आंदोलनात सहभागी झाले. त्यामुळे कामकाजावर परिणाम जाणवला. अनेक विभागांतील कामकाज पूर्णपणे बंद राहिले....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/ipY1DQAA

📲 Get Kolhapur News on Whatsapp 💬