[Kolhapur] - वेदगंगेचे पाणी पात्र

  |   Kolhapurnews

म. टा. वृत्तसेवा, गारगोटी

गारगोटीसह भुदरगड तालुक्यात आज दिवसभर पावसाची संततधार सुरूच असून तालुक्याच्या पश्चिमेकडील कडगाव पाटगाव परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. गेल्या २४ तासांत पाटगाव परिसरात तब्बल १५० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणातून सुमारे १७०० क्युसेक व पॉवर हाऊसमधून ३०० क्युसेक असे एकूण दोन हजार क्युसेक वेगाने पाणी वेदगंगा नदी पात्रात येत असल्याने पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे पाणी पात्राबाहेर आले आहे.

नुकत्याच आलेल्या महापुरामुळे जनजीवन सावरतेय तोपर्यंत पुन्हा मुसळधार पावसाने सुरुवात झाल्याने नदीकाठच्या लोकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पाटगाव, वेसर्डे, कोंडुशी व डेळे या डोंगराकाटच्या परिसरात मुसळधार पाऊस होत आहे. या परिसरात धुक्याची दाट छाया निर्माण झाली आहे. या परिसरातील कोंडुशी तलावाच्या सांडव्यावरून तीन ते चार फूट पाण्याचा विसर्ग सुरू असून कोंडुशी डोंगरावरील 'सडा' नावाच्या पठारावरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा ओघ वाढत आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/xBeJPAAA

📲 Get Kolhapur News on Whatsapp 💬