[Mumbai] - आमचा आवाज

  |   Mumbainews

मोबाइलचोरांवर वचक हवा

रेल्वे स्थानकांमधील फक्त आठ टक्के मोबाइल फोनचोरींचा छडा लागल्याचे वास्तव उघड झाल्याने मुंबईकरांनी संताप व्यक्त केला आहे. पोलिस यंत्रणा सक्षम नसल्याचा आणि त्यांच्यात गांभीर्य नसल्याचा हा परिणाम आहे, असे मत सामान्य मुंबईकर मांडत आहेत.

नागरी वेषातील पोलिस हवेत

मुंबईची लोकसंख्या सातत्याने वाढती आहे. त्यामुळे मुंबईचा भार वाढत असताना सुरक्षा यंत्रणेवरही ताण पडतो. त्यातून गर्दीची वेळ ही चोरांसाठी सोयीस्कर वेळ झाली आहे. रेल्वेतील मोबाइल चोरीचा आकडा वाढता असल्यास नागरी वेषात सुरक्षा कर्मचारी व पोलिस जागोजागी तैनात करण्याची गरज आहे.

पोलिस सक्षमता आवश्यक

रेल्वे स्थानकांतील केवळ आठ टक्के मोबाइल चोरीचाच छडा लागल्याची आकडेवारी रेल्वे पोलिसांची सक्षमता उघड करते. अनेक प्रवासी चोरीच्या घटनांची नोंदही करीत नाहीत. महिला प्रवाशांची वाढती असुरक्षितता, चालत्या लोकलवरील दगडफेकीच्या घटना लक्षात घेता रेल्वेमध्ये स्वतंत्र पोलिसांची गरज आहे. साध्या वेशातील पोलिस पथके स्थापन करून नियमितपणे गस्ती हवी. तरच ही स्थिती नियंत्रणात येईल....

फोटो - http://v.duta.us/DispiQAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/os1N2wAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬