[Mumbai] - मुंबईत राहण्याची आता भीती वाटते; संतापाचा पूर

  |   Mumbainews

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः ट्रेन बंद पडल्या. रस्ते वाहतूक ठप्प. प्रवासी धोका पत्करून रेल्वे रुळांवरून चालताहेत. रस्त्यावर, गल्लीबोळात कुठे गुडघाभर पाणी, तर कुठे कंबरभर. त्यातून वाट काढत घर गाठण्याची कसरत. गायब झालेले लोकप्रतिनिधी. कुणाचा आधार नाही की मार्गदर्शन नाही. संकटातून बाहेर पडण्यासाठी प्रत्येकाची व्यक्तिगत पातळीवर चाललेली धडपड. रात्री उशिरा लोकल सुरू झाल्यानंतर मरणाच्या गर्दीत स्वत:ला झोकून देणारे प्रवासी... बुधवारचा संपूर्ण दिवस अत्यंत हालात काढलेल्या मुंबई व परिसरातील लोकांमध्ये एकूणच सरकारी यंत्रणेविषयी कमालीचा रोष निर्माण झाला आहे.

बुधवारच्या पावसात झालेली परवड पाहता यापुढे कुणावर भरवसा ठेवावा, असा प्रश्न मुंबईकरांना पडला आहे. दर पावसाळ्यात मुंबई थांबली की मंदिरात, पालिकेच्या शाळांमध्ये आधार घेत दिवस काढायचा आणि आला दिवस पुढे ढकलायचा, असेच चित्र कायम राहणार का, असा उद्विग्न सवाल होत आहे. सेवाभावी मंडळांच्या कार्यकर्त्यांनी केलेली मदत हाच दिवसभरातील काय तो दिलासा. ट्रेन कधी सुरू होणार याविषयी काहीही नाही. पर्यायी व्यवस्था नाही. रात्री घरी परतण्यासाठी ओला, 'उबर'चे दर परवडणारे नव्हते. रिक्षा-टॅक्सी उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे काही किमी पायपीट करण्याची वेळ आली. या सगळ्यात सरकारी यंत्रणांचे अस्तित्वच जाणवत नव्हते. त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड संताप असून, त्यांच्या कहाण्यांमधून या संतापाच्या ठिणग्या बाहेर पडताना दिसत आहेत....

फोटो - http://v.duta.us/j_j8mgAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/KQennwAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬