[Mumbai] - यापूर्वीच्या अशा पावसात मुंबई कोलमडली नव्हती...

  |   Mumbainews

कुलाबा येथे १०० मिलीमीटरहून कमी पाऊस पडूनही शहर ठप्प

@anujaacMT,

मुंबई

यंदा चार वेळा मुंबईकरांनी अती तीव्र मुसळधार पावसाला तोंड दिले आणि त्यामुळे मुंबई कोलमडली. मात्र या पूर्वीही मुंबईत पावसाचा कहर झाला होता, तरीही मुंबईकरांवर पाऊस थांबल्यानंतरही अशा परिस्थितीशी इतका वेळ झुंजण्याची वेळ आली नव्हती. यामुळे यंत्रणांचे पितळ उघडे पडले आहे. कुलाबा येथे १०० मिलीमीटरहून कमी पाऊस पडूनही शहर ठप्प झाले. या आधीच्या आकडेवारीवरून हे उघड होते.

या पूर्वी सन २००९ पासून सन २०१८ पर्यंत सांताक्रूझ येथे सात वेळा अति तीव्र मुसळधार म्हणजे २०० मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. तर कुलाबा येथे आठ वेळा २०० मिलीमीटरहून जास्त पाऊस झाला आहे. सन २००९ मध्ये सांताक्रूझ येथे ५ जुलै आणि १५ जुलै या दोन्ही दिवशी २०० मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली होती. ५ जुलै रोजी २४ तासांमध्ये २४३ तर १५ जुलै रोजी २४ तासांमध्ये २७४ मिलीमीटर पाऊस पडला होता. ४ सप्टेंबर रोजी बुधवारचा पाऊस हा सहा तासांमध्ये २०० मिलीमीटरहून जास्त असला तरी तो सहा तासांनंतर कमी झाला होता. उपनगरांमध्ये २४ तासांमधील पाऊस २४२.२ मिलीमीटर नोंदवला गेला तरी कुलाबा येथे हा पाऊस केवळ ७३.६ मिलीमीटर होता. असे असताना संपूर्ण शहर का कोलमडले असा प्रश्न निर्माण होतो....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/SPEZGQAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬