[Nagpur] - इरई धरणाचे सात दरवाजे उघडेच

  |   Nagpurnews

म.टा. वृत्तसेवा, चंद्रपूर

मुसळधार पावसाने चंद्रपूरसह जिल्ह्यातील बहुतांश भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर, बुधवारी सायंकाळी ब्रह्मपुरी तालुक्यातील रामपुरी गावात अतिवृष्टी झाल्याने घर कोसळून कुडामातीच्या ढिगाऱ्याखाली दबून चिमुकल्याचा मृत्यू झाला. सोहम सचिन वनस्कर (वय ५), असे मृत बालकाचे नाव आहे. दरम्यान, इरई धरणाचे गुरुवारी या मोसमात पुन्हा सहाव्यांदा सात दरवाजे उघडेच होते.

ब्रह्मपुरी तालुक्यातील रामपुरी गावात अतिवृष्टीने मातीच्या घराची भिंत पूर्णतः भिजल्याने काही वेळातच ती कोसळली. त्यावेळी घरात खेळत असलेला सोहम हा मातीच्या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली सापडल्याने मृत्युमुखी पडला. जिल्ह्यातील चारगाव, चंदई, लभानसराड, असोलामेंढा, नलेश्वर या धरणात १०० टक्के पाणीसाठा गोळा झाला आहे. इरई धरण ९७ टक्के भरलेले असून सर्व सात दरवाजामधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी 'मटा'ला दिली....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/v05JWgAA

📲 Get Nagpur News on Whatsapp 💬