[Nagpur] - श्रद्धेला जोड सामाजिक उत्तरदायित्वाची!

  |   Nagpurnews

म. टा. प्रतिनिधी, नागपूर

दरवर्षीच्या महालक्ष्मीपूजनाच्या धार्मिक सोहळ्याला सामाजिक जाणीवेची जोड देत कुमारिकांचे 'अष्टलक्ष्मी' म्हणून पूजन करण्याचा अनोखा उपक्रम प्रसिद्ध निवेदिका रेणुका देशकर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी गुरुवारी आयोजित केला होता. अहल्या मंदिर येथील ईशान्य भारतातील आठ मुलींना देवीचे रूप मानून त्यांचे पूजन करण्याचा कार्यक्रम गुरुवारी देशकर यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आल्या होता.

मागील शंभर वर्षांपासून देशकर कुटुंबात महालक्ष्मींची प्रतिष्ठापना आणि पूजन केले जाते. यंदाचे या पूजनाचे शंभरावे वर्ष असल्याने वेगळ्या पद्धतीने हा उत्सव साजरा करण्याचा निर्णय या कुटुंबाने घेतला. महालक्ष्मींच्या पारंपरिक पूजनाबरोबर आठ कुमारिकांचे 'अष्टलक्ष्मी' म्हणून पूजन करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार, धंतोली येथील अहल्या मंदिरात राहणाऱ्या आठ कुमारिकांना गुरुवारी देशकर यांच्याकडे आमंत्रित करण्यात आले होते. या आठही मुली ईशान्य भारतातील असून, नागपुरात वास्तव्यास आहे. देवीच्या पारंपरिक पूजनाप्रमाणेच या मुलींचेही साग्रसंगीत पूजन देशकर कुटुंबातील महिलांच्या हस्ते करण्यात आले....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/x1IXiQAA

📲 Get Nagpur News on Whatsapp 💬