[Nashik] - अस्वच्छता, रोगराईचे महासभेत पडसाद

  |   Nashiknews

मालेगावात सर्वपक्षीय नगरसेवक आक्रमक

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील रस्त्यांची दुरवस्था , अस्वच्छतेने पसरलेल्या रोगराईमुळे गेल्या काही दिवसांपासून पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींना टीकेला सामोरे जावे लागत आहे. गुरुवारी झालेल्या महासभेतदेखील सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनास धारेवर धरीत प्रश्नांचा भडीमार केला. अखेर महासभेने शहरातील औषध फवारणीचे काम खासगी संस्थेकडून करून घेण्याबाबतचा निर्णय घेतला.

येथील महापालिकेच्या सभागृहात महापौर रशीद शेख, उपमहापौर सखाराम घोडके, उपायुक्त नितीन कापडणीस, नगरसचिव राजेश धसे यांच्या उपस्थिती गुरुवारी महासभा झाली. औषध फवारणी यंत्रणा तोकडी असून शहरात डेंग्यू, मलेरिया पसरत आहे. त्यामुळे औषध फवारणीचे काम खासगी संस्थेमार्फत करण्याचा प्रस्ताव चर्चेस आला. यावरून सत्ताधारी नगरसेवकांनी उपायुक्त कापडणीस व प्रशासनाला धारेवर धरले.

प्रभागात महिनाभर कचरा पडून असतो. त्यामुळे डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत. नियमित फवारणी होत नाही. अधिकाऱ्यांना फोन केला तर माणसे नाहीत अशी बेजबाबदार उत्तरे मिळतात. जर तुमच्याकडे शहर स्वच्छतेसाठी माणसे नसतील तर आम्हाला कामाला लावा' असा टोला नगरसेविका आशा आहेर यांनी लगावला....

फोटो - http://v.duta.us/-clpIgAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/bbwtkgAA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬