[Nashik] - नाशिकमधील घरांची तपासणी

  |   Nashiknews

संशयित अधिकाऱ्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी पाच लाखांची लाच घेणाऱ्या नाशिकच्या अनुसूचित जमातीप्रमाणपत्र तपासणी समितीच्या (एसीबी) उपसंचालकासह चौघांना कोर्टाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. चौघा संशयितांपैकी दोघे क्लास वन अधिकारी असून, त्यांच्या घराची झडती प्रक्रिया हाती घेण्यात येत असल्याचे 'एसीबी'चे अधीक्षक सुनील कडासने यांनी सांगितले.

एसटी प्रवर्गाचे जात वैधता प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी उपसंचालक रामचंद्र रतीलाल सोनकवडे, विधिअधिकारी शिवाप्रसाद मुकुंदराव काकडे, खासगी चालक विनायक उर्फ सचिन उत्तमराव महाजन आणि लॅब बॉय मच्छिंद्र मारुती गायकवाड या चौघांनी तक्रारदाराकडून पाच लाख रुपयांची मागणी करून लाचेची रक्कम स्वीकारली. त्यांना गुरुवारी सकाळी अहमदनगरच्या एसीबी पथकाने शिर्डीतील हॉटेलमधून जेरबंद केले. यातील सोनकवडे हे क्लास वन अधिकारी असून, त्याचे घर द्वारका परिसरातील काठे गल्ली येथे आहे. विधी अधिकारी असलेले काकडे सुद्धा क्लास वन अधिकारी असून, ते सिडकोतील शिवाजी चौकातील वसंत विहार या इमारतीत राहतात. विनायक उर्फ सचिन उत्तमराव महाजन हा चालक याच इमारतीत राहतो. चौथा संशयित गायकवाड हा वर्ग चारचा कर्मचारी असून, तो नगरचा रहिवाशी आहे....

फोटो - http://v.duta.us/wArgMAAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/qlw_FwAA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬